प्रतिनिधी/ सातारा :
शहरातील नागरिकांना कसलेही भान राहिले नसून मास्क न लावता अनेकजण फिरत असतात. जिल्हाधिकाऱयांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्या सूचनेनुसार शहरात वाहतूक शाखेच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाने कारवाई करून गुरुवारी दिवसभरात 8500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.








