वार्ताहर / माशेल
कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदी जारी केल्यानंतर माशेल मार्केटात नागरिकांनी खरेदीसाठी दुकानात गर्दी केली होती. त्या संदर्भात तरूण भारतने माशेल येथे किराणा मालाच्या दुकानात खरेदीसाठी झुंबड या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेत फोंडा पोलिसांनी काल रविवारी माशेल बाजार परिसरात पोलीस फौजफाटा तैनात करून संचारबंदीची कडक अंमलबजवाणी केली. रविवारी पोलिसांनी गर्दीवर बऱयापैकी नियंत्रण ठेवलेले आहे. जीवनाश्यक वस्तू व्यक्तीरीत कोणतेही दुकान उघडे करण्यात सक्ती मनाई केली. मासळी मार्केटातही गर्दीवर बरेच नियंत्रण होते. त्यामुळे दुपारनंतर संचारबंदीची कडकपणे अंमलबजावणी माशेल परिसरात पाहायला मिळाली. कोरोनाच्या लढयात व्यापारी व नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक तत्वाचे पालन कराले असे आवाहन निरीक्षक मोहन गावडे यांनी केले आहे.









