प्रतिनिधी/ रत्नागिरी
पावस येथील मावळंगेतील एक 16 वर्षीय मुलगा आणि 55 वर्षीय महिलेचे आठवडाभरापूर्वी नाकातून रक्त आणि उलटी झाल्याने रूग्णालयात दाखल करताच दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना एकाच गावात घडल्या होत्या मात्र या दोघांच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट नाही मात्र पुण्यातून व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर हे कारण स्पष्ट होईल अशी माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
काही दिवसापूर्वी शेतात काम करताना नाकातून रक्त येवून उलटी झाल्याने 55 वर्षीय महिलेचा आणि एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते कारण या दोघांचाही मृत्यू नेमके कोणत्या आजाराने झाला हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. या वाडीतील 14 लोकांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले असून यातील एकजण पॉझिटीव्ह आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे आता नेमका मयत झालेल्या दोन्ही रूग्णांना कोरोनाची लागण झाली होती का? आणि काय झाले होते ते व्हिसेरा रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.








