बळ्ळारी नाल्याजवळ घडला अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
भरधाव मालवाहू वाहनाने ठोकरल्याने पादचाऱयाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी जुन्या पी. बी. रोडवरील बळ्ळारी नाल्यानजीक ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.
प्रताप लक्ष्मण सालगुडी (वय 49) रा. रथ गल्ली, जुने बेळगाव असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवीचे नाव आहे. रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास प्रताप मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी कुरियर वाहतूक करणाऱया वाहनाने ठोकरल्याने ते जागीच ठार झाले.
केए 22, बी 7135 क्रमांकाच्या वाहनाचा चालक अरुणकुमार बी. के. (वय 49) रा. रामदेव गल्ली, वडगाव याच्यावर वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रताप सेंट्रिंगचे काम करीत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









