मालवण / प्रतिनिधी-
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलमध्ये सामाजिक वनीकरण विभाग मालवणच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
सध्या कोरोना महामारीत पर्यावरणाचे महत्व सर्वानाच प्रकर्षाने जाणवू लागले आहे. आज सर्वच जण कोरोनाच्या कठीण परिस्थितीतून जात असल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मालवणच्या भंडारी हायस्कूलच्या प्रांगणात प्रशाळेचे पर्यवेक्षक एच. बी. तिवले यांच्या हस्ते सोनचाफ्याचे प्रतिनिधीक वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सामाजिक वनीकरण विभाग मालवणच्या स. रोपवन अधिकारी श्रीम अश्विनी लोखंडे , वनपाल श्री प्रकाश शिंदे, सहाय्यक शिक्षक आर डी श्री. बनसोडे , श्री. आर बी देसाई आदी उपस्थित होते या कार्यक्रमात लॉक डाऊन मुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.