कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पडल्या, एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघींचाही मृत्यू
प्रतिनिधी/मिरज
मिरज तालुक्यातील मालगाव येथे दोन सख्ख्या जावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली. सारिका महावीर पाटील (वय 33) आणि अर्चना सुरगोंड पाटील (वय 36) अशी मृत महिलांची नवे आहेत.
मालगाव-सावळी रोडवर असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर यापैकी एक जण पाय घसरून पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुसरीलाही आपला जीव गमवावा लागला. जीव रक्षक टीमच्या जवानांनी दोघींचा मृतदेह बाहेर काढला. एकाच कुटुंबात दोन महिलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मालगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








