नवी दिल्ली
: देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गेल्या सप्टेंबरमध्ये वाहन उत्पादनात 25 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. मारुती सुझुकीने मागच्या सप्टेंबरमध्ये 1 लाख 66 हजार वाहनांचे उत्पादन घेतले आहे. हेच उत्पादन मागच्या वषी याच महिन्यात 1 लाख 32 हजार इतके होते. कंपनीने आल्टो, एसपेसो या मिनी कार्सचे 30 हजार 400 इतके उत्पादन मागच्या सप्टेंबरमध्ये केले आहे. गेल्या वषी हेच उत्पादन सप्टेंबरमध्ये 23 हजार 73 इतके नोंदवले गेले होते. म्हणजेच उत्पादनामध्ये 32 टक्के वाढ करण्यात आली आहे.









