अबकारी अधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
मारुतीनगर परिसरात सीएल-2 वॉईन शॉपला विरोध करण्यात येत आहे. यासंबंधी अबकारी अधिकाऱयांना स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले असून वॉईन शॉप सुरू झाले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अबकारी अधिकारी रवी मुरगोड यांना निवेदन देण्यात आले आहे. मारुतीनगर परिसरात लोकवस्तीत सीएल-2 वॉईन शॉप हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या परिसरात सध्या अनेक दुकाने आहेत. त्यामुळे महिलांना फिरणेही मुश्किल झाले आहे. नव्या दुकानाला परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. बसवराज दोडमनी, बाबू संगोळी, विनायक मिरजकर आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत..









