रशियाच्या हल्ल्यात मोठे नुकसान
युक्रेन आणि रशियाचे युद्ध 34 व्या दिवशीही सुरूच आहे. सातत्याने होणाऱया रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. परंतु सर्वाधिक संकट मारियुपोलमध्ये दिसून आले आहे. या शहरात रशियाच्या हल्ल्यांमूळे 5 हजार लोक मारले गेले आहेत. तसेच हजारो लोक बेघर झाले असून रुग्णालये जखमींमुळे भरून गेली आहेत. कधी कुठला बॉम्ब क्षणभरात जीवन संपवून टाकेल ही भीती लोकांना सतावत आहे. मृतदेह आता उद्याने आणि शाळांमध्ये दफन केले जात आहेत. 90 टक्के इमारती आता भग्नावस्थेत आहेत.
मारियुपोलमधील दूरसंचार यंत्रणा पूर्णपणे नष्ट झाली आहे. कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी लोकांना आता सोशल मीडियावर अवलंबून रहावे लागत आहे. मारियुपोल शहराला राजधानी कीव्हशी जोडणारा पूल रशियाने उद्ध्वस्त केला आहे.
शहरातील एका शाळेत 400 लोकांनी आश्रय घेतला होता, त्या शाळेवरच रशियाने हवाई हल्ला केला ओ. 33 दिवसांच्या युद्धात युक्रेनच्या मारियुपोल सहर नेक शहरांमध्ये मोठा विध्वंस घडून आला आहे. लोक अन्न-पाण्यासाठी व्याकुळ असून मोठय़ा रांगांमध्ये कित्येक तास उभे राहिल्यावर लोकांना काही अन्न मिळत आहे.









