बसपच्या दुसऱया यादीत 51 पैकी 23 उमेदवार मुस्लीम
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्याच्या अंतर्गत निवडणूक होणाऱया मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहेत. एकूण 55 पैकी 51 मतदारसंघांचे उमेदवार बसपने निश्चित केले आहेत. दुसऱया टप्प्यात पहिल्या यादीपेक्षाही अधिक मुस्लीम उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. 51 घोषित उमेदवारांपैकी 23 जण हे मुस्लीम आहेत.
बसपने सहारनपूर जिल्हय़ातील बेहट मतदारसंघात रईस मलिक, नकुड येथे साहिल खना तर गंगोहमध्ये नोमान मसूद यांना तिकीट दिले आहे. तर बिजनौर जिल्हय़ातील नजीबाबाद मतदारसंघात शाहनवाज आलम, बढापूर येथे मोहम्मद गाजी, धामपूरमध्ये कमाल अहमद, चांदपूर येथे शकील हाशमी आणि नूरपूर मतदारसंघात हाजी जियाउद्दीन अंसारी यांच्यावर बसपकडून विश्वास दाखविण्यात आला आहे.
याचबरोबर मुरादाबाद जिल्हय़ातील कांठ मतदारसंघात आफाक अली खां, ठाकुरद्वारामध्ये मुजाहिद अली, मुरादाबाद ग्रामीण मतदारसंघात अकील चौधरी, मुरादाबाद शहरमध्ये इरशाद हुसैन सैफी, कुंदरकी येथे हाजी चांद बाबू मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संभलच्या असमोलीमध्ये रफत उल्ला, संभल येथे शकील अहमद कुरैशी आणि गुन्नौरमध्sय फिरोज यांना तिकीट मिळाले आहे. रामपूरच्या चमरौव्वा मतदारसंघात मुस्तफा हुसैन आणि रामपूरमध्ये सदाकत हुसैन यांना बसपकडून संधी देण्यात आली आहे. अमरौहाच्या नौगांव सादात मतदारसंघात शादाब खान, अमरौहामध्ये मोहम्मद नावेद अयाज हे बसपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहेत. बदायूंच्या सहसवान येथून हाजी बिट्टन मुसर्रत तर शेखुपूरमध्ये मुस्लीम खान याच्यावर विश्वास दाखविण्यात आला आहे. बसपने 45 टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात मुस्लीम नेत्यांना उमेदवारी दिली आहे.









