प्रतिनिधी/ बेळगाव
मानस योग साधनेच्या प्रसारासाठी 65 वषीय साधक प्रकाश एकबोटे मंगळवार दि. 11 जानेवारीपासून बदामीपर्यंत पदयात्रा करणार आहेत. वडगाव येथील देवांग समाजाच्या बनशंकरी देवस्थानचे भक्त दरवषी बदामी बनशंकरी यात्रेला पायी जातात. त्यामध्ये प्रकाश एकबोटे सहभागी होत असून दररोज 35 ते 40 किलो मीटर चालत मानस योग साधनेचा प्रसार करणार आहेत.
विशेष म्हणजे 9 दिवस ते अन्न न घेता दुपारी 12 वाजता व रात्री 8 वाजता लिंबू आणि मध घातलेले दोन ग्लास पाणी पिऊन पदयात्रा करणार आहेत. लवकरच या साधनेचे शिबीरही ते घेणार आहेत.
माणसांच्या रोगावर वैज्ञानिकरितीने प्रयोग करून श्री राम चरित्र योग साधना रचण्यात आली आहे. एकबोटे गेली तीन वर्षे ही साधना करत आहेत. या साधनेचे प्रमुख उत्तरप्रदेश येथील गोपाळ शास्त्री यांच्या उपस्थितीत लवकरच शिबीरही घेण्यात येणार आहे.









