वृत्तसंस्था/ माद्रिद
स्पेनमध्ये कोरोना महामारीची परिस्थिती अद्याप म्हणावी तशी सुधारली नसल्याने सप्टेंबर महिन्यात येथे होणारी माद्रिद खुली पुरुष आणि महिलांची टेनिस स्पर्धा न भरवण्याचा सल्ला स्थानिक आरोग्य अधिकाऱयांनी स्पर्धा आयोजकांना दिला आहे. सदर स्पर्धा 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार होती.
27 सप्टेंबरपासून पॅरिसमध्ये सुरू होणाऱया प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी टेनिसपटूंना माद्रिद टेनिस स्पर्धा सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची होती. स्पेनची राजधानी माद्रिद येथे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ही स्पर्धा यापूर्वी एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर सदर स्पर्धा 12 ते 20 सप्टेंबर दरम्यान घेण्याचे ठरले होते.
29 जुलै रोजी माद्रिदमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा मंडळाचे वरि÷ अधिकारी आणि आरोग्य संघटनेचे अधिकारी यांच्या बैठकीत स्पेनच्या राजधानीतील सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अशा स्थितीमध्ये सदर स्पर्धा घेणे धोक्मयाचे ठरू शकेल. त्याचप्रमाणे खेळाडूंच्या आरोग्यावर विपरित परिणाम घडू शकेल. मादिदच्या आरोग्य विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांनी या स्पर्धा आयोजकांना सदर स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे तीन लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोना समस्येमुळे तब्बल जवळपास पाच महिने व्यावसायिक टेनिस हंगाम पूर्णपणे बंद करण्यात आला होता. डब्ल्यूटीए टूरवरील पालेर्मो महिलांची खुली टेनिस स्पर्धा सोमवारपासून सुरू होत आहे.









