प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात गुरुवारी तीन वेगवेगळ्या गावात प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर त्या तिन्ही बाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण ४६ व्यक्तींचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत पलंगे यांनी दिली.
माढा तालुक्यातील भोसरे, रिधोरे व आकुंभे येथे प्रत्येकी एक करोना बाधित रुग्ण आढळले. यामध्ये एक महिला व दोन पुरुष अाहेत. भोसरे येथील रुग्णाने कुर्डुवाडी येथील दोन खासगी हाॅस्पीटल मध्ये तपासणी केली व त्यानंतर तिसऱ्या खासगी रुग्णालयात दोन दिवसांसाठी अॅडमिट झाला.तेथून त्यांना बार्शी येथे पुढील उपचारासाठी नेले असता कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचा अहवाल आला .त्यामुळे या रुग्णाच्या अतिसंपर्कातील कर्मचारी, इतर व्यक्ती यांचेही स्वॅब घेण्यात आले. तीन्ही रुग्णांच्या अतिसंपर्कातील एकूण ४६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








