ओटवणे / प्रतिनिधी:
माडखोल येथील अण्णा फौजदार व तुकाराम राऊळ यांच्या स्मरणार्थ माडखोल फुगीवाडीत मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन होम. डी. वाय. एस. पी. तथा पोलीस निरीक्षक सौ संध्या गावडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी संध्या गावडे यांनी या वाचनालयाचे कौतुक केले. वाचनाने माणूस सुसंस्कृत बनतो तसेच आजच्या युवा पिढीला स्पर्धात्मक परीक्षा, सरकारी नोकरी मधील परीक्षा यासाठी या वाचनालयाचा नक्कीच उपयोग होणार असुन त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही सौ गावडे यांनी दिली. यावेळी होम.डी. वाय.एस. पी. सिंधुदुर्ग संध्या गावडे यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष जॉकी डिसोजा यांच्याहस्ते तर शासकीय आदर्श पुरस्कार प्राप्त आंबोली मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा सत्कार माडखोल माजी सरपंच संजय लाड यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्रनाथ तुकाराम राऊळ यांनी केले होते.
यावेळी देवस्थान मानकरी दत्ताराम तुकाराम राऊळ, दत्ताराम भिकाजी राऊळ, रमेश घाडी, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन जॅकी डिसोजा, माजी सरपंच राजन राऊळ, संजय लाड, विजय बंड, संजय राउळ, ओटवणे गावप्रमुख रवीद्र गावकर,
विश्वास राउळ, विजय ठाकूर, सत्यवान राउळ, सुबोध राउळ, अनिल सौंदेकर, संतोष राऊळ, भिकाजी जाधव, बुधाजी गावडे, बाबू डिसोजा, शिवाजी सावंत, रोहित गोताड, गुरुनाथ राऊळ, सुमंत राऊळ, प्रकाश मुरकर, सुरेंद्र काकतकर, स्वाती काकतकर, गायत्री राऊळ मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन आडेलकर यांनी तर आभार जिजी राऊळ यांनी मानले.Attachments area
Previous Articleसावंतवाडीत १८ ऑगस्टला रक्तदान शिबीर
Next Article उगाडे रस्त्यासाठीचे उपोषण स्थगित









