ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
जेएनयूएसयू अध्यक्ष आइशी घोष हिला पोलिसांनी जेएनयूत 4 जानेवारीला झालेल्या तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपी ठरवल्यानंतर आइशीने पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर तिने पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. ती म्हणाली, माझ्यावर हल्ला झाला त्याचा एफआयआर दाखल केला गेला नाही आणि मूळ मुद्दा बाजूला ठेवत उलट मलाच संशयित म्हणून सांगत आहेत.
विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि संशियीतामध्ये आइशी सह 9 विद्यार्थ्यांची नावे सांगून त्यांचे फोटोही दिले आहेत.
ती म्हणाली, काही व्हिडिओमध्ये मी दिसली तर मला संशियत बनवलं आहे. आणि माझ्यावर हल्ला झाला त्यावर काहीच कारवाई होताना दिसत नाही. कॅम्पसमध्ये फिरणं गुन्हा आहे का ? कोणी कितीही म्हटलं म्हणून मी संशयित ठरत नाही. माझ्या हातात रॉड होता का? मी चेहरा झाकला होता का? दिल्ली पोलिसांनी आपला तपास करावा. माझ्यावर कसा हल्ला झाला त्याचे पुरावे माझ्याकडेही आहेत.









