ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा मनोहर जोशी यांचे सोमवारी पहाटे तीन वाजता निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
अनघा मनोहर जोशी यांचा जन्म 2 जानेवारी 1945 रोजी झाला. त्यांचे माहेरचे नाव मंगल हिगवे. मनोहर जोशी यांच्याशी 14 मे 1964 रोजी त्यांचा विवाह झाला. अनघा जोशी यांच्या पश्चात पती मनोहर जोशी, पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असा परिवार आहे.
मनोहर जोशी सरांच्या राजकीय व सामाजिक जीवनातल्या यशात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली.









