प्रतिनिधी / करमाळा
माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्या (ता.१९) दुपारी ३ वाजता करमाळा तालुक्यातील कंदर व शेलगाव (वांगी) येथे भेट देणार असून या भागातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच या परिसरातील शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहेत. फडणवीस यांचा उद्या पुणे, सोलापूर व उस्मानाबाद असा तीन जिल्ह्याचा दौरा आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील मळद, रावणगाव, खडकी, स्वामीचिंचोली, निमगाव केतकी, या गावांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील रोसा-जामगाव (ता.परांडा) व सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील टाकळी- गार अकोले, तसेच करमाळा तालुक्यातील कंदर व शेलगाव (वांगी) येथे उद्या भेट देणार आहेत. असा दौऱ्याचा कार्यक्रम फडणवीस यांचे स्वीयसहाय्य्क देवराम पळसकर यांनी जाहीर केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









