बेंगळूर/प्रतिनिधी
जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी आज बेंगळूर येथील आपल्या निवासस्थानी केरळच्या आगामी निवडणुकांच्या रणनीतींवर केरळमधील नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे जेडीएस आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीनुसार लढणार असल्याचे स्पष्ट होते.
यावेळी देवेगौडा यांनी जेडीएसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि एमएलसी बीएम फारुख, केरळचे जलसंपदा मंत्री आणि आमदार के. कृष्णनकुट्टी आणि केरळ जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री मॅथ्यू टी. थॉमस यांच्यासमवेत विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा केली.









