ऑनलाईन टीम
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात (ईडी) ने अनिल देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. यावेळी ईडीने देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यालाही समन्स बजावला आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले आहे.
Previous Article‘नव्याने सुसज्ज ललीत भवन उभारण्यासाठी कामगार मंत्री सकारात्मक’
Next Article शेतकरी आंदोलक आक्रमक; भाजपा नेत्याचे फाडले कपडे








