वार्ताहर / यड्राव
पैसे मागितल्याचा राग मनात धरून लाकडी काठीने हातावर, पायावर व पाठीवर जबर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी माजी आमदार पुत्र नितीन जांभळे राहणार डेक्कन चौक शेजारी इचलकरंजी याच्याविरोधात तेजस सातगोंडा कांबळे वय वर्षे 20 राहणार विकास नगर इचलकरंजी यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तेजस कांबळे याने त्यांचे मित्र शैलेश कांबळे व कुमार सूर्यवंशी यांच्याकडे पंधरा दिवसापूर्वी पैसे मागितले होते. त्याचा राग मनात धरून दिनांक 9 रोजी दुपारी नितीन जांभळे याने तेजस कांबळे यास त्याच्या अशोका स्कूल जवळ असलेल्या सायझिंगमध्ये बोलावून घेतले त्यानंतर वादावादी करत काठीने त्याच्या पायावर हातावर व पाठीवर जबर मारहाण केली.









