सातारा / प्रतिनिधी :
मूळचे सायगाव-पवारवाडी ता. जावली येथील माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रकाश पवार (वय 68) यांचे आज अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.
नाशिक पोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून राज्यातील अति महत्वाच्या पदावर कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश पवार यांचा अतिशय शिस्तप्रिय व जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकीक होता. त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सोलापूर, अहमदनगर, रायगड, पुणे ग्रामीण येथे विशेष काम केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी शैलजा, संग्राम मुलगा व तेजस्वीनी, पायलट – कॅप्टन यशास्विनी या दोन मुली असा परीवार आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध व्यवसायिक राजेंद्र पवार यांचे ते बंधू होत.









