प्रतिनिधी / ओटवणे:
माजगावात गेल्या दोन महिन्यात 183 कोरोना रुग्ण साफडले असुन आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गावात सध्या 50 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी माजगावात सोमवारपासुन दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरवात करण्यात आली आहे.
मंगळवार 15 जून पर्यंत चालणाया या लॉकडाऊनची गावात कडक अंमलबजावणी गावात करण्यात येतं असुन अत्यावश्यक सेवा वगळता गावात जनता कर्फ्युसह गावात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. गावातून जाणारे सावंतवाडी – बांदा आणि सावंतवाडी – मळगाव हे दोन्ही मुख्य मार्ग वगळता माजगावात येणारे आठही मार्ग बंद करण्यात आले आहे. या गावातील सुभेदार तिठा, कासारवाडा, कुंभारवाडा, गुलाबी तिठा, दत्त मंदिर, मोर डोंगरी, ख्रिचनवाडा, हेळेकर देवस्थान या सर्व रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे या कडक लॉकडाऊनमधून मेडिकल, डाँक्टर, स्थानिक दूध विक्रेते या अत्यावशक सेवेसह सध्या खरीप हंगामास प्रारंभ झाल्याने शेतकरी वर्गाला वगळण्यात आले आहे. गावात नियमांचे कोणीही उल्लंघन केल्यास तसेच विनामास्क कोणीही आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या लॉकडाऊनसाठी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी कोरोना कृती समिती यांनी नियोजन केले आहे