सणासुदीच्या कालावधीमधील विक्रीचा प्रामुख्याने समावेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाहन क्षेत्र हे प्रामुख्याने कोरोना संकटापासून अडचणीचा प्रवास करत असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये चालू सणासुदीच्या कालावधीत मागील दहा वर्षांमध्ये सर्वात नकारात्मक कामगिरी केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये नवरात्रीपासून दीपावलीपर्यंत 42 दिवसांचा फेस्टिव्हल पार पडला आहे. या दरम्यान वाहनांची नोंदणी मात्र म्हणावी तशी झाल्याचे दिसून आले नसल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीमधून सांगण्यात आले.
ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण वाहनांची नोंदणी ही वर्षाच्या आधारे 5.33 टक्क्यांनी घसरली आहे. याची तुलना ऑक्टोबर 2019 सोबत केल्यास हा घसरणीचा टक्का 26.64 टक्क्यांवर गेला असल्याची माहिती वाहन फेडरेशन संघटना फाडा यांनी दिली आहे. ही बाब ऑटो क्षेत्रासाठी चिंतादायक आहे.
42 दिवसांमधील प्रभावीत विक्री
चालू वर्षातील 42 दिवसांच्या फेस्टिव्हल सीझनच्या दरम्यान, प्रवासी वाहनांची विक्री 3,24,542 युनिट झाली असून मागील वर्षातील समान कालावधीत हा आकडा 4,39,564 युनिट्सच्या तुलनेत 26 टक्के कमी आहे. यासह विक्रीत वर्षाच्या आधारे 18 टक्के घसरण झाल्याची नोंद आहे.
चिप कमतरतेचाही परिणाम
देशातील वाहन क्षेत्रासोबत जगातील वाहनांच्या निर्मितीत चिपची कमतरता असल्याने त्याचा परिणाम वाहन उत्पादनावर झाल्याने विक्रीला फटका बसला आहे.









