मोर जी/प्रतिनिधी :
मांदे हायस्कूल मध्ये शिक्षक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्ये÷ शिक्षिका सौ.रोझ लिया बारेटो यांनी माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन वैशिष्टय़ा वर प्रकाश टाकला समाज भूषण असलेल्या सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या गुणांचा अवलंब सर्वांनी करायला हवा.असे सांगितले यावेळी व्यासपीठावर मांद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक विवेक बोडके अन्य शिक्षक उपस्थित होते
शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिक्षकांनी ’ कोरोना आणि शिक्षण ” या विषयावर पथनाटय़ सादर केले तसेच यावेळी गायनाचा कार्यक्रम पार पडला
यात शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱयां dचा सहभाग होता
विश्वनाथ आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले प्रज्ञा नाईक हिने आभार मानले









