प्रतिनिधी /पणजी
महिलांच्या सक्षमीकरणावर भाजप सरकारने नेहमीच भर दिलेला आहे. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून गावा? गावातील अनेक महिलांनी आपापले छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून स्वयंपूर्ण गोवा बनवण्यात हातभार लावलेला आहे, असे उद्गार भारतीय जनता महिला मोर्चाच्या राज्य प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी आज येथे काढले.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. शीतल नाईक, प्रदेश सरचिटणीस शिल्पा नाईक, रंजीता पै आणि पर्यावरण कार्यकर्त्या वैशाली शिरोडकर चव्हाण होत्या.
सुलक्षणा सावंत म्हणाल्या, भाजप सरकारने महिलांसाठी केवळ कल्याणकारी योजना राबवल्या नाहीत तर महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी बळ दिले. मुख्यमंत्री रोजगार योजनेतून अनेक जणांनी ब्य?टीपार्लर सुरू केली. स्वयंसेवी गटांच्या माध्यमातून अनेक अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. या साऱयांच्या मागे भाजपचे राज्यातील सरकार ठामपणे उभे राहिले. त्यामुळे भाजपचा खऱया अर्थाने जागतिक महिला दिन आपल्या कार्यालयात साजरा करण्यास पात्र आहे.
डॉ नाईक यांनी यावेळी नमूद केले की भाजपने तळागाळातील महिलांना पुढे येऊन आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आजवर संधी दिलेली आहे. भारतीय जनता महिला मोर्चाच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे राज्यभरात मार्गी लावली आहेत. गृह आधार योजना ही देशातील अनोखी योजना असून स्वयंपाक घराच्या महागाईची झळ महिलांना विशेषतः गृहिणींना जाणवू नये याची काळजी या योजनेतून घेण्यात येते. यावेळी इतरांनीही आपली मते व्यक्त केली आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.









