वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी आता माजी महिला क्रिकेटपटूंची लिजेंड्स लिग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी भारताची माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामी प्रमुख ऍम्बॅसिडर म्हणून राहील.
या स्पर्धेसाठी महिला क्रिकेट क्षेत्रातील सर्व सामनाधिकाऱयांचे पथक निवडण्यात आले आहे. या संघामध्ये विविध देशांच्या आयसीसीच्या पंच पॅनेलमधील सदस्या तसेच सामनाधिकारी यांचा समावेश आहे. या संपूर्ण लिग क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेची सँडे फ्रिज सामनाधिकारी म्हणून राहील. या स्पर्धेत शुभदा भोसले-गायकवाड ही भारतातर्फे पंच म्हणून राहील. दक्षिण आफ्रिकेची लॉरेन ऍजेनबॅग, पाकची हुमारा फराह तसेच हाँगकाँगची माँटेगो मेरी यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. सदर स्पर्धा जानेवारीच्या उत्तरार्धात खेळविली जाणार असून या स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण सोनी टेन-1 आणि सोनी टेन-3 या वाहिन्यांवर केले जाणार आहे. पुरुषांची लिजेंड्स लिग क्रिकेट स्पर्धा 20 ते 29 जानेवारी दरम्यान मस्कत येथे खेळविली जाणार असून या स्पर्धेचे ऍम्बॅसिडर म्हणून बॉलिवूड क्षेत्रातील ज्ये÷ अभिनेते अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.









