प्रतिनिधी / बेळगाव
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांचा महिला आघाडीतर्फे रविवारी प्रचार करण्यात आला. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिला मंडळांच्या भेटी घेऊन त्यांना म. ए. समितीलाच मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला आघाडीच्यावतीने शाहूनगर येथील ताराराणी महिला मंडळ, जिजाऊ महिला मंडळ, मधुरा महिला मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळ, स्त्रीशक्ती महिला मंडळ यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना समितीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रिया कुडची, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, भाग्यश्री जाधव, प्रभावती सांबरेकर, इंदू पाटील, अर्चना कावळे, रेखा गोजगेकर, माजी महापौर वंदना बेळगुंदकर यांच्यासह इतर महिला यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.









