मुंबई
एक्सयुव्ही 500 आणि स्कार्पिओ यासारख्या गाडय़ांची निर्मिती करणारी कंपनी महिंद्रा हिला सासयोंग कंपनीतील आपला वाटा कमी करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने हिरवा कंदील दाखविला आहे. सासयोंग मधील महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचा 75 टक्के असणारा वाटा आता 25 टक्के असणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या कारवाईला लवकरच प्रारंभ केला जाणार असल्याचे महिंद्रा आणि महिंद्राने स्पष्ट केले आहे. सासयोंगमधील आपला वाटा कमी करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी अर्ज केला होता.









