प्रतिनिधी / कोल्हापूर
अचानक पुढे ढकललेली एमपीएससी' परिक्षा, महावितरणकडून सुरु असलेली वीज कनेक्शन तोडणी, या महाविकास आघाडीच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करुन कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी केली. दुपारी बाराच्या सुमारास महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणीएमपीएससी’ परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले. या ठिकाणी राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषण देत परिसर दणाणून सोडला.
यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनता म्हंटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असून गुरुवारी संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटले. या परीक्षेसाठी राज्यभरातून साधारण 6 लाख विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्याच्या मार्गावर असताना ऐन वेळेस ही परीक्षा सहाव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा पुढे गेल्यानंतर सर्व विद्यार्थी नाउमेद झाले आहेत.
त्याचबरोबर अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात ऊर्जा मंत्र्यांनी विज बिल माफी व वीज कनेक्शन तोडणार नाही असे निवेदन केले होते. पण अधिवेशन संपताच महावितरण कंपनीला वीज तोडणीचे आदेश दिले हे निषेधार्ह आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनता व एमपीएससी च्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. तो दूर होत नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही.
आंदोलनात सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मैत्राणी, विजय जाधव, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, भगवान काटे, नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, गणेश देसाई, गायत्री राऊत, आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, मंगला निपाणीकर, सचिन तोडकर, संतोष माळी, विवेक वोरा, राजू मारे, संतोष लाड, विवेक शिराळकर आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









