मुंबई / ऑनलाईन टीम
देशात कोरोना रूग्णसंख्या झपट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंल लागू राहणार आहेत. मात्र राज्यातील हे निर्बंध १ मे नंतरही वाढवण्यात येऊ शकतात, असे संकेत आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिले आहेत. जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. आम्ही अजूनही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. काही ठिकाणी कोविड-१९ च्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सीआरपीसीच्या कलम १४४ च्या उल्लंघनाचे प्रकार दिसून आले आहेत. राज्यात कोरोनामुळे ज्या प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे ते पाहता राज्यात लावण्यात आलेले निर्बंध मे महिन्यापर्यंत पुढे वाढवण्यात येऊ शकतात. मात्र ही बाब कोरोनाच्या स्थितीवर अवलंबून असेल.
राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी १५ दिवसांसाठी निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांनंतर राज्यात जे परिणाम समोर येतील, त्याचा आढावा घेतला जाईल. त्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल. राज्यातील लोक या निर्बंधांना सहकार्य करत आहेत, असे राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले
Previous Articleबेंगळूर येथे सोमवारी राज्य सरकारची बैठक
Next Article कर्नाटक बस संप: बीएमटीसीतील २,४४३ कामगार निलंबित








