ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 6,126 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 7,436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 195 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 61 लाख 17 हजार 560 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.69 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,87,44,201 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,27,194 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,47,681 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,928 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सद्य स्थितीत 72 हजार 810 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
- मुंबई : सध्या 4,530 रुग्णांवर उपचार सुरू

मुंबईत मागील 24 तासात 363 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर 438 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कालच्या दिवशी 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,36,022 वर पोहचली असून त्यातील 7,13,161 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत 15,920 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण दुप्पतीचा काळ 1,595 दिवस इतका आहे.








