ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत चालला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. राज्यात मागील 24 तासात 39 हजार 544 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 277 जणांचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात प्रथमच इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 28 लाख 12 हजार 980 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 54 हजार 649 एवढा आहे.

कालच्याा एका दिवसात 23,600 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 24 लाख 00 हजार 727 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 56 हजार 243 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 % तर मृत्युदर 1.94 % इतका आहे.
- मुंबई : 51,411 रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईतत कालच्या दिवसात 5,394 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 3,130 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 14 हजार 714 वर पोहचली आहे. तर 3,50,660 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,686 इतकी आहे. सद्य स्थितीत 51 हजार 411 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्य स्थितीत रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांचा आहे.








