ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 232 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 2916 वर पोहोचली आहे.
गेल्या चोवीस तासात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील मृत्यूचा आकडा 203 वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत राज्यभरात 295 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 2916 पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 जण होम क्वारंटाईन आहेत.
त्याच बरोबर मुंबईत एका दिवसात 183 जणांना कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 1896 झाली आहे.









