ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतो आहे. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर आता कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.
- मुंबईत 9,989 नवे बाधित

दरम्यान मुंबई – पुणे – नागपूर शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुबंईत गेल्या 24 तासात 9989 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 58 जणांनी आपला जीव एका दिवसात गमावला आहे. कालच्या दिवशी 8554 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर 4 लाख 14 हजार 641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 464 आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर 35 दिवसांवर आला आहे.
- पुण्यात 12 हजार 377 रुग्णांची नोंद

पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 12 हजार 377 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात 6,679 रुग्ण, पिंपरी चिंचवड क्षेत्रात 2,409 रुग्ण तर पुणे ग्रामीण क्षेत्रात 2,465 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
- नागपूरमध्ये दिवसभरात 7, 201 रुग्ण

नागपूरमध्ये मागील 24 तासात 7,201 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 63 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 78 हजार 556 वर पोहोचली आहे. यासोबतच काल 3,240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 लाख 17 हजार 313 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत नागपूरमध्ये 55,474 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,769 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला.
- 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन ?
दरम्यान, मागील 24 तासात 63,294 बाधित आढळून आले तर 349 जणांनी आपला जीव गमावला. राज्यात वाढत चाललेली संसर्ग साखळी तोडण्यासाठी 14 दिवसांपासून तीन आठवड्यापर्यंतच्या लॉकडाऊनची शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे. तर 14 एप्रिल नंतरच्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.








