ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आज 5493 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 626 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 7429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात 2330 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 70 हजार 607 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.59 % आहे. तर मृत्यू दर 4.51 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 9 लाख 23 हजार 502 नमुन्यांपैकी 7 लाख 58 हजार 776 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 1 लाख 64 हजार 626 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 37 हजार 350 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.