ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात 531 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये 51 पोलीस अधिकारी आणि 480 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कोरोनाबाधित पोलीस योद्ध्यांपैकी 39 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पाच पोलीस योद्ध्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सध्या 43 अधिकारी आणि 444 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
तर मृतांमध्ये कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे, वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर, मुंबई पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे, पुण्याच्या फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे आणि सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख यांचा समावेश आहे.









