ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात शनिवारी 2608 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1577 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
शनिवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 821 रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत 13 हजार 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 32 हजार 201 रुग्ण उपचार घेत आहेत. काल दिवसभरात 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये मुंबईत 40, पुणे 14, सोलापुर 2, वसई-विरार, ठाणे, सातारा आणि नांदेडमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये 41 पुरुष आणि 19 महिला रुग्ण आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 026 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 47 हजार 190 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 33 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









