नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये महाराष्ट्राचे जीएसटीचे २४ हजार ३६० कोटी रुपये केंद्राने द्यावेत याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पंतप्रधान मोदींसमवेत झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. राज्याचे जीएसटीचे २४ हजार ३६० कोटी रुपये मिळावेत. पीक विम्याचं बीड मॉडेल संपूर्ण राज्यात लागू करावं. सध्या बीडमध्ये ते लागू आहे. एनडीआरएफच्या निकषात बदल करावेत, यापूर्वी २०१५ मध्ये नियम बदलण्यात आहेत. आता २०२१ मध्ये आहोत त्यामुळे नियम बदलण्यात यावेत, असं ते म्हणाले.
१४ व्या वित्त आयोगातील निधी महाराष्ट्राला मिळावा. शहरी आणि ग्रामीणसाठीचे केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली.
मराठा आरक्षणाबाबत केंद्राने भूमिका घ्यावी
इतर मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण
मागासवर्गीयांचं पदान्नतीमधील आरक्षण
केंद्राकडून मिळणारा जीएसटीचा परतावा वेळेत मिळावा
पीकविमा अटी-शर्तींचं सुलभीकरण – बीड मॉडेल
मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेची उपलब्धता
नैसर्गिक आपत्तीबाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष बदलणे
राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करणं – स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)
चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (शहरी स्थानिक)
चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळावा (पंचायत राज ससंस्था)
राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा