मुंबई \ ऑनलाईन टीम
देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रातील एकही नेता पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकला नाही. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना गडकरींनी सूचक विधान केले आहे. एक मराठी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं.
आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश करत आहोत. पण पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एखादा नेता, देशाचा पंतप्रधान का झाला नाही, असा प्रश्न नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर, महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही. महाराष्ट्रासह देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. मग त्याची जात, धर्म, पंत आणि राज्य कोणतेही असो. एखादा मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल, तर तो पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल, असे स्पष्ट मत नितीन गडकरी यांनी यावेळी मांडले.
महाराष्ट्र प्रगतीशील आणि समृद्ध राज्य आहे. त्यामुळे आपली ताकद आणि त्रुटी समजून घेण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांचा विचार करक मुंबईचा विकास केला पाहिजे. मुंबईला तिन्ही बाजूने समुद्र असून विकास होण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. नवी मुंबईतही गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील उद्योग-व्यावसायाचं महाराष्ट्रात विकेंद्रीकरण झालं तर राज्याचा विकास होईल. महाराष्ट्र सरकारने सल्लामसलत करुन पुढील २५ वर्षांचं व्हिजन डॉक्यूमेंट तयार केलं पाहिजे. अमलबजावणी केल तर महाराष्ट्र अजून पुढे जाईल आणि गरिबी, भूकबळी यातून मुक्त होईल,” असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








