मुंबई/प्रतिनिधी
राज्याच्या पश्चिम भागात पूर व्यवस्थापनासाठी अलमट्टी धरणातून पाण्याचे विसर्ग २ लाख क्युसेकपेक्षा अधिक वाढवावे, असे आवाहन महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारला केले आहे. दरम्यान, जलसंपदामंत्री जयंत पाटील शुक्रवारी, “महाराष्ट्र कर्नाटक सरकारशी संवाद साधत आहे. सध्या अलमट्टी धरणातून पाण्याचे विसर्ग दोन लाख क्युसेकपर्यंत आहे. आम्ही कर्नाटक सरकारला आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यासाठी विनंती करत आहोत. ” संततधार पावसामुळे कृष्णा खोऱ्यातील पाण्याची पातळी वाढत असल्याने अनेक शहरे व खेड्यांमध्ये पूर आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर शहरांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे कबूल करताना पाटील म्हणाले, “पूर-संवेदनशील भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. हे एक अवघड काम आहे आणि संपूर्ण राज्य सरकारची यंत्रणा कमला लागली आहे. ”
मंत्री पाटील यांनी लोकांना आपला जीव धोक्यात घालू नये म्हणून जोरदार आवाहन केले आहे. तसेच पाऊस सुरूच राहिल्यास “सांगली, सातारा आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आपल्याला वास्तववादी दृष्टिकोन बाळगला पाहिजे. नद्या व धरणाच्या काठावर राहणाऱ्या लोकांना पुन्हा स्थानांतरित करणे आवश्यक आहे. ” असे ते म्हणाले.