ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यानची सीमा सील केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच छत्तीसगड-मध्यप्रदेशची सीमा सील करण्यात येणार आहे.
शिवराज सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आमच्या शेजारी राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये ही स्थिती भयावह आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राची सीमा सील केली आहे. छत्तीसगडमधून येण्या-जाण्यावरही लवकरच निर्बंध लागतील.’
दरम्यान, महाराष्ट्रात केवळ अत्यावश्यक सेवा, आपत्कालीन सेवा आणि मालवाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.









