पर्यायी वाहतूक कसबा-अत्रवली फाटा तुरळमार्गे, वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पुलाचे ऑडीट पूर्ण
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या चिपळुणातील वाशिष्ठी नदीवरील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता शनिवारी संगमेश्वरमधील शास्त्री पुलाचे ऑडीट होणार आहे. त्यासाठी 4 तास पूल वाहतुकीस बंद ठेवला जाणार असल्याने तेथील वाहतूक कसबा, अत्रवली फाटा, कडवई तुरळमार्गे वळवण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील 2 पूल व संगमेश्वर येथील शास्त्राr पुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडीट केले जात आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेली पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिअरिंगच्या एजन्सी, चौपदरीकरण कंत्राटदार कंपनी आणि महामार्गाचे अधिकारी यांच्याकडून गेले 2 दिवस वाशिष्ठी पुलाच्या वेगवेगळय़ा तपासण्या केल्या गेल्या. वाशिष्ठी पुलाचे ऑडीट पूर्ण झाल्याने शनिवारी संगमेश्वर येथील शास्त्राr नदीवरील शास्त्राr पुलाची दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत तपासणी होणार असल्याने त्यावरील वाहतूक बंद ठेऊन ती शास्त्राr पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ अशी वळवण्यात येणार आहे.









