वार्ताहर /कास
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर सकाळी चालकाचा ताबा सुटल्याने कार दरीत कोसळून अपघात झाला. यात तीन शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तापोळा अतिवृष्टीमुळे खराब झालेले रस्ते 1 महिना उलटून गेला तरी दुरूस्त झाले नाही. दुरुस्तीचे काम अर्धवट टाकून फक्त कामांवर कब्जा मिळवण्याची ठेकेदार यांची स्पर्धा चालू आहे. मात्र सामान्य जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे.
आज सकाळी खांबील गोल येथील शाळेकडे तापोळ-महाबळेश्वर रोडवरून निघालेल्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या 4 चाकी कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार खचलेल्या दरीत पलटी झाली. कारमधील वाळणे शाळेचे शिक्षक अंकुश टेबरे, आवळण शाळेचे विलास आवळे, वेंगळे शाळेचे राजेंद्र पिसाळ हे तीन शिक्षक जखमी गंभीर जखमी झाली आहेत. जखमी शिक्षकांना तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरता उपचार करून पुढील उपचारासाठी वाई येथे हालविण्यात आले आहे..








