सांगली / प्रतिनिधी
महानगरपालिका क्षेत्रात रोज सकाळ आणि संध्याकाळ अश्या दोन वेळी बाजार भरतो. या बजारासाठी मनपा क्षेत्रात आरक्षित जागा विकसित केला नसल्याने सदर बाजार रस्त्यावरच भरत आहे. वाढत्या गर्दीमुळे बाजाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहन चालक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करवा लागत आहे. या अपूऱ्या जागेचा फटका दुकानदार आणि भाजी विक्रेते यांना त्रास होत आहे.
या बाबत एकत्रित बैठक घेऊन आठवडा बाजार ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्यात. अशी मागणी नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे केली आहे.