योजनेची नीट अंमलबजावणी करण्याच्या सूचना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोविड काळात जिल्हय़ात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी सुरळीत होत नसल्याची माहिती समोर आल्यानंतर या योजनेतील 7 रुग्णालयांना जिल्हा रूग्णालयाकडून नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यामागोमाग या रुग्णालयांना 100 टक्के अंमलबजावणीसाठी योजनेच्या राज्य हमी सोसायटीने 3 महिन्यांची ताकीद दिली आहे. दर महिन्याला याचा आढावा जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे.
‘महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून कोरोना रूग्ण वंचित’ असल्याची बाब प्रशासनासमोर आल्यानंतर जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालयाने या योनतेतील जिह्यातील परकार हॉस्पिटल, श्री रामनाथ हॉस्पिटल, लाईफ केअर हॉस्पिटल, वालावलकर हॉस्पिटल, एसएमएस हॉस्पिटल व अपरान्त हॉस्पिटल व दीनदयाळ या सातही रूग्णालयांना ठोस अंमलबजावणीसाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी पूर्णपणे अंमलबजावणी न करणाऱया 3 रुग्णालयांना नोटीस बजावल्या होत्या. यामध्ये परकार, दीनदयाळ व चिपळूणमधील एसएमएस हॉस्पीटला समावेश होता.
पहिल्या नोटीसीच्या माध्यमातून प्रशासनाने रुग्णालयांना इशारा दिला असून याची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे राज्य हमी सोसायटीने स्पष्ट केले आहे. दर महिन्याला न चुकता या सातही रूग्णालयांच्या अंमलबजावणीच अहवाल घेण्यात येणार आहेत. या रूग्णालयांनी 80 टक्के बेड या योजनेसाठी आरक्षित ठेवायचे आहेत. मुळात महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचा लाभ सर्वसामान्य रूग्णांना कोरोना काळातही मिळाला पाहिजे. याची अंमलबजावणी सुरळीत न होणे ही चुकीची बाब असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करून नोटीस काढल्या होत्या. आता 3 महिन्यात या हॉस्पीटलकडून कोणत्या सुधारणा होणार, याचा पाठपुरावा राज्य हमी सोसायटी करणार आहे.
जिह्यातील सात खासगी रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्याची परवानगी देण्यात आली आह़े राज्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कोरोना रूग्णांना द्यावा, असे आदेश शासनाकडून देण्यात आले होत़े पिवळ्य़ा व केशरी रंगाच्या रेशनकार्डधारकांना याचा लाभ देण्यात येणार आह़े कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी शासनाकडून 20 हजार रुपयांचे पॅकेज निश्चित करण्यात आले आह़े त्यापुढे होणारा खर्च रूग्णांनी स्वतः करावयाचा आह़े









