काश्मीरप्रकरणी बरळले : इम्रान यांनी मानले आभार
वृत्तसंस्था/ क्वालांलपूर
काश्मीरवर स्वतःच्या आधारहीन विधानांवर पश्चाताप व्यक्त केल्याच्या दुसऱयाच दिवशी मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी घुमजाव केले आहे. क्वालांलपूर येथे आयोजित एका सोहळय़ात महातिर यांनी स्वतःच्या जुन्या विधानाचा बचाव करत याप्रकरणी नुकसान पोहोचण्याची शक्यता असूनही हा मुद्दा निवडला होता, असे म्हटले आहे. महातिर यांच्या या भूमिकेचे समर्थन करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आभार मानले आहेत.
मागील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत वादग्रस्त मुद्दय़ावर मी भाषण केले होते. जे बोललो त्याच्यासाठी माफी मागणार नाही. परंतु माझ्या विधानामुळे भारताने मलेशियातून होणारी पामतेलाची निर्यात रोखल्याचा खेद असल्याचा दावा महातिर यांनी पाकिस्तानकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
अशाप्रकारच्या मुद्दय़ांवर बोलण्यासाठी मोठी किंमत फेडावी लागते हे माहिती नव्हते. परंतु आता मी पंतप्रधान नाही. काश्मीर मुद्दय़ावर कुठल्याही बहिष्काराच्या भीतीशिवाय बोलू शकतो असा दावा त्यांनी केला आहे. मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर यांच्या पोकळ विधानांचे इम्रान खान यांनी कौतुक केले आहे.









