प्लेन किंवा रवा इडली नेहमीच खाल्ली जाते. इडलीला थोडा ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही मटार इडली बनवू शकता.
साहित्य : एक कप मटार, एक कप रवा, एक कप दही, तीन ते चार हिरव्या मिरच्या, एक कांदा, एक इंच आलं, चमचाभर तेल, थोडी राई, उडदाची डाळ दोन चमचे, कढीपत्त्याची सहा ते सात पानं, मीठ.
कृती : रव्यात दही घालून मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा. मटार, हिरव्या मिरच्या, कांदा आणि आलं मिक्सरमध्ये वाटून घ्या. एका कढईत तेल गरम करा. त्यात राई, कढीपत्ते आणि उडदाची डाळ घालून फोडणी तयार करा. दही आणि रव्याचं मिश्रण तपासून बघा. त्यावर ही फोडणी घालून सगळं मिश्रण एकजीव करा. या मिश्रणात मटारची पेस्ट आणि मीठ घालून नीट मिसळून घ्या. आता इडलीच्या प्लेट्समध्ये मिश्रण भरा. इडल्या करून घ्या. सांबार किंवा खोबर्याच्या चटणीसोबत खायला द्या. ही पौष्टिक इडली सगळ्यांना खूप आवडेल.









