प्रतिनिधी/ महाबळेश्वर :
ब्रिटीश कालिन उत्तम वास्तुकलेचा नमुना असलेले व संपुर्ण स्थानिक जांभ्या दगडातील बांधकाम असलेली येथील ग्रामिण रूग्णालयाची इमारत नुतनीकरणा नंतर आता कात टाकुन नव्या जोमाने रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे + उदया दि 8 रोजी जागतीक आरोग्य दिनाचे औचित्य साधुन या ग्रामिण रूग्णालयाच्या इमारत नुतनीकरणाचे औपचारीक गणेश पुजन करून साध्या पध्दतीने लोकार्पण होत आहे
ब्रिटीशांचे उन्हाळयातील आवडते ठिकाण म्हणुन महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण ओळखले जाते याच ठिकाणी त्यांनी अनेक सोई सुविधा सुरू केल्या लोकसंख्या कमी असतानाही गावातील लोकांच्या प्राथमिक सोई सुविधांसाठी येथे ब्रिटीशांनी नगरपालिका सुरू केली आरोग्याच्या सुविधा साठी भव्य ग्रामिण रूग्णालय सुरू केले हे ग्रामिण रूग्णालय राज्यातील सर्वांत मोठे ग्रामिण रूग्णालय म्हणुन ओळखले जाते ब्रिटीशांनी बांधलेले हे रूग्णालय प्रारंभी येथील पालिका चालवित होते परंतु निधी अभावी पालिकेने हे रूग्णालय शासनाला हस्तांतर केले शासनाने हे रूग्णालय ताब्यात घेतले परंतु लोकांना काही आरोग्य सुविधा मिळणे दुरापास्त झाले रूग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली हे रूग्णालया खाजगी संस्थेकडे चालविण्यासाठी देण्याची मागणी जोर धरू लागली आघाडी सरकाने या मागणी कडे दुर्लक्ष केले परंतु महाविकास आघाडीने स्थानिक नागरीकांनी केलेल्या मागणी प्रमाणे रूग्णालय खाजगी संस्थेकडे देण्याच्या हालचाली सुरू केल्या या साठी शिवसेनेचे तत्कालिन आरोग्य मंत्री ना दिपक सावंत यांनी पुढाकार घेतला स्थानिक आ मकरंद पाटील यांनीही या मागणीचा जोरदार पाठपुरावा केला सावंत यांचे नंतर तत्कालिन आरोग्य मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी हस्तांतराचे सर्व सोपस्कार पुर्ण करून फेबुवारी 2019 मध्ये या रूग्णालयाचे पुढील एक वर्षासाठी काही अटींवर हस्तांतर केले रेडक्रॉस सोसायटी संचालिक बेल ऐअर यांनी हे रूग्णालय चालविण्यासाठी ताब्यात घेतले
रूग्णालयाचे हस्तांतर तर झाले परंतु हॉस्पिटल चालविणे हे तारेवरची कसरत आहे हे लवकरच लक्षात आले आणि रूग्णालयाला निधीची चणचण भासु लागली एकिकडे रूग्णालय चालविण्यासाठी निधीची कमतरता व रूग्णालय इमारतीचे नुतनीकरणाचा आवाढव्य खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहीला याच वेळी संकटमोचक म्हणुन मुंबईचे उदयोगपती जयसिंह मरीवाला हे उभे राहीले जयसिंह मरीवाला यांनी नुतनीकरणाची सर्व जबाबदारी घेतली दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे हे महाबळेश्वरला आले होते तेव्हा त्यांनी या रूग्णालयाला भेट दिली या वेळी त्यांनी नुतनीकरणा संदर्भात काही सुचना केल्या इमारतीच्या ढाच्या मध्ये बदल न करता त्याचा ब्रिटीश कालिन लुक आहे तसाच ठेवुन नुतनीकरण करण्यात यावे अशी सुचना मुख्यमंत्री ना उध्दव ठाकरे यांनी केली
ग्रामिण रूग्णालयाची इमारत ही 25 हजार स्केअर फुट आहे पैकी 14 हजार स्केअर फुट इमारतीचे नुतनीकरण करण्याचा निर्णय जयसिंह मरीवाला यांनी घेतला त्यांनी निधी गोळा करण्यास प्रारंभ केला या साठी त्यांची स्वताःची एक ट्स्ट आहे त्या माध्यमातुन शिवाय महाबळेश्वर येथे ज्या ज्या धनिकांचे बंगले आहे त्यांना जयसिंह मरीवाला यांनी मदतीचे आवाहन केले या आवाहनास प्रचंड प्रतिसाद मिळाला व निधीची अडचण दुर झाली मुंबई येथील आर्किटेक्ट ध्रुती वैदय मुंबई यांनी या नुतनीकरणासाठी तब्बल साडेतीन कोटी रूपयांचे उत्तम बांधकाम साहीत्य पुरविले अशाच प्रकारे अनेक अदुश्य हात मदतीसाठी पुढे आले पाहता पाहता सहा महीन्यात ग्रामिण रूग्णालयाच्या इमारतीचे नुतनीकरणाचे काम पुर्ण झाले कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युध्दपातळीवर हे रूग्णालय तयार व्हावे अशी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या नुसार काम सुरू झाले या कामात ज्या ज्या वेळी अडचणी येत होत्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी हे मोलाची मदत करीत असल्याचेही मरीवाला यांनी सांगितले आज या रूग्णालयाच्या इमारतीचे गणेश पुजन करण्यात येत आहे या पुजना नंतर हे रूग्णालय रूग्णांच्या सेवेसाठी लोकार्णण करण्यात येणार आहे









