मुसळधार पावसामुळे शिवारातील पिके पाण्याखाली, पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान, शेतकरी चिंतेत, रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद
वार्ताहर / कुद्रेमनी
मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कुद्रsमनी गाव परिसरातील नाले, विहिरी, शिवार तुडुंब भरून वाहत आहे. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांध फुटून शेकडो एकर भात शेती पाण्याखाली व मातीखाली जवून शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गावाजवळील लेंडीनाला फुटल्याने नुकतीच केलेली रोपलावणी वाहून गेली. बुधवारपासून जोराचा पाऊस पडत आहे. शेतवडीकडे जाणाऱया मार्गांमध्ये असलेले छोटे-मोठे अनेक नाले दुथडी भरून वहात आहेत. लेंडीनाला, बेरड शेताचा नाला, सरदारची ओहोळ, लेहार शेत नाला, कोलेमाळ नाला आदी नाल्यांना प्रचंड पाणी आल्याने शेतात जाण्याचे मार्ग बंद झाले. अनेक नाल्यांच्या बांधावरून पाणी पडत असून अनेक बांध फुटून गेले आहेत. त्यामुळे मळक शेतवड, किलघट, बोकुरांग, रांगी, कामत पट्टेपसोटी गुरवाळ आदी शिवारे जलमय झाली आहेत. संपूर्ण शिवारातील भातपिके पाण्याखाली गेली आहेत. तर काही शिवारात शेतांचे बांध फुटून भातांची पिके मातीखाली गेल्याने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
शेतवडीकडे जाण्याचा मार्ग बंद
सध्या नाल्यांना भरपूर पाणी आल्याने शेतवडीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. जनावरेही गोठय़ातच बांधून ठेवली आहेत. कोलेमाळ नाल्याला पाणी आल्यामुळे गावच्या पूर्वेकडील रवळनाथ देवस्थान मंदिरापासून पुढे शिनोळीकडे जाण्याचा मार्ग, बेरड शेत नाल्याला पाणी आल्याने ढेकोळी गावाकडे जाण्याचा मार्ग, लेंडीनाल्याला पाणी आल्याने सोनोली, बेळगुंदी गावाकडे जाणारा मार्ग बंद झाला. गावच्या पश्चिमेला बाबर शेतवडीत काही नागरिक वस्ती राहतात. रहदारीच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी वहात असल्यामुळे गावाकडे दूध डेअरीला, किराणा दुकानाकडे व बाजार करण्यासाठी नागरिकांना पाण्यातूनच ये-जा करावी लागली.
ऊस मळ्याचे नुकसान
पावसामुळे या भागातील मळ्यातील ऊस पडून शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून समस्या निर्माण झाल्या. काही ठिकाणी जुन्या घरांच्या भिंती पडल्या आहेत.
सध्या भातरोप लागवडीचा हंगाम जोरात सुरू आहे. पंधरवडय़ापूर्वी बऱयाच शेतवडी पाण्याअभावी रोपलागवडीची कामे खोळंबून अर्धवट झालेली होती. सध्या जोराच्या पावसामुळे शिवारातील शेतीमध्ये मुबलक पाणी झाले तरी सध्या पाणी जास्त असल्याने भात रोप लागवडीसाठी चिखल करणे अवघड झाले आहे. यंदा भात रोपांची टंचाई निर्माण झाल्याची चर्चाही शेतकरी वर्गातून होत आहे.
शेती जलमय, भातपीक धोक्मयात
सांबरा ः तालुक्मयाच्या पूर्वभागातील बळ्ळारी नाल्यासह इतर नाल्यांना पूर आल्याने सर्व शिवार जलमय झाले आहे तर शिवारातील बांध फुटून मोठय़ा प्रमाणावर शेतकऱयांचे नुकसान झाले आहे.
बळ्ळारी नाल्याला पूर आल्याने परिसरातील हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर सांबरा, बाळेकुंद्री खुर्द व मोदगा येथून वाहणाऱया नाल्यानाही पूर आला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व शेती जलमय झाली असून भातपिकासह इतर पिके धोक्मयात आली आहेत. गुरुवारपासून पावसाने रुद्रावतार धारण केल्याने दिवसेंदिवस नाल्यातील पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. यामुळे पुराचे पाणी शिवारात पसरून शेतांचे बांध फुटून गेले आहेत तर अलीकडे लावलेल्या भातरोपांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना आर्थिक फटका बसला आहे. भातशेतीमध्ये पाणी साचून राहिल्याने अलीकडेच उगवलेली भातपिके कुजून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱयांवर अस्मानी संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे अनेकांनी सुटी घेऊन राहणे पसंत केले आहे. लोक बाहेर पडत नसल्याने रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी तातडीने याची दखल घेऊन पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









