ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात रोज नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची स्टोरी सांगितली आहे. इंटरव्हलनंतरची स्टोरी मी सांगणार आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एनसीबीच्या धाडसत्रात पैशांचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत माफिचा साक्षीदार किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर सईल याने मोठय़ा धाडसाने खुलासा केला आहे. त्याच्या हिंमतीची दाद द्यायला हवी. त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईतच नव्हे थेट दिल्लीपर्यंत आहेत. नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली आता त्यापुढची स्टोरी मी सांगणार आहे. येत्या काही दिवसात मी या प्रकरणासंदर्भात दहा व्हिडिओ देणार आहे. त्यामधून देशभक्तीचा मुखवटा पांघरणाऱयांचे पितळ उघडे पडणार आहे, असेही राऊत म्हणाले.








